येलूरमध्ये बापाकडून मुलाचा कुऱ्हाडीने खून

By admin | Published: March 13, 2016 01:00 AM2016-03-13T01:00:39+5:302016-03-13T01:00:39+5:30

कुऱ्हाडीने घाव

Yaleur's father murdered by father in Kurla | येलूरमध्ये बापाकडून मुलाचा कुऱ्हाडीने खून

येलूरमध्ये बापाकडून मुलाचा कुऱ्हाडीने खून

Next

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे शुक्रवारी रात्री ३३ वर्षीय व्यसनी मुलाचा बापाने कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर संशयित बापाने पलायन केले होते. रात्री उशिरा त्यास अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमर शंकर पाटील (वय ३३, रा. कोणोली वसाहत, येलूर) असे मृताचे नाव आहे. त्याच्या डोक्यात, तोंडावर, गळ्यावर, पोटावर कुऱ्हाडीचे आठ घाव बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता. अमर हा वडील शंकर गणपती पाटील (वय ५५) यांच्यासोबत राहत होता. मृत अमर याला दारूचे व्यसन होते. तो वडिलांना त्रास देत असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. शुक्रवारी रात्रीही तो दारू पिऊनच घरी आला होता. शेतजमीन वाटून पाहिजे यासह इतर अनेक कारणांसाठी तो वडिलांशी वाद घालत होता. त्यामुळे वडीलही त्याच्या त्रासास कंटाळले होते. घरी आल्यानंतर अमर झोपला असता मध्यरात्री ते पहाटेदरम्यान कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. याबाबत त्याचा भाऊ प्रवीण शंकर पाटील याने कुरळप पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये अज्ञाताने खून केल्याचे म्हटले होते, मात्र घटना घडल्यानंतर वडील शंकर पाटील हे घरातून निघून गेल्याने त्यांच्यावर संशय बळावला. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Yaleur's father murdered by father in Kurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.