चिंचलीची मायाक्का देवीची यात्रा २६ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:35+5:302021-02-12T04:24:35+5:30

मायाक्का देवस्थान विश्वस्त समितीने ही माहिती दिली. गेल्यावर्षी मायाक्का देवीची यात्रा संपल्यानंतर कोरोनाचा फैलाव सुरू झाला. त्यानंतर गेल्या वर्षभरात ...

Yatra of Mayakka Devi of Chinchli from 26th | चिंचलीची मायाक्का देवीची यात्रा २६ पासून

चिंचलीची मायाक्का देवीची यात्रा २६ पासून

googlenewsNext

मायाक्का देवस्थान विश्वस्त समितीने ही माहिती दिली. गेल्यावर्षी मायाक्का देवीची यात्रा संपल्यानंतर कोरोनाचा फैलाव सुरू झाला. त्यानंतर गेल्या वर्षभरात महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सर्वच लहान-मोठ्या यात्रा रद्द झाल्या होत्या. व्यावसायिकांना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. सुदैवाने मायाक्का देवीच्या यात्रेत मात्र खंड पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देवस्थान समितीने माहिती दिली की, २६ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत यात्रा भरेल. २ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस असून यादिवशी महानैवेद्य व देवीची पालखी मिरवणूक निघेल.

महाराष्ट्र व कर्नाटकात चिंचली यात्रा नावाने ही यात्रा प्रसिद्ध आहे. देवीचे लाखो भक्त बैलगाडीने यात्रेसाठी जातात. शिवाय मुंबईतूनही शेकडो खासगी बसेस भरून यात्रेकरू येतात. कोरोनाचा संसर्ग सध्या अत्यल्प असल्याने यात्रा भरविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

-----

Web Title: Yatra of Mayakka Devi of Chinchli from 26th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.