यंदा पावसाचा अंदाज ठरला खरा; गाढवाने तारले, कोल्हाही मदतीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:48+5:302021-06-24T04:18:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : हवामानाचा अंदाज नेहमी चुकतोच कसा, असा सवाल वारंवार उपस्थित होत असतो; मात्र यंदा हवामानाचा ...

This year's rain forecast came true; Donkeys rescued, foxes helped | यंदा पावसाचा अंदाज ठरला खरा; गाढवाने तारले, कोल्हाही मदतीस

यंदा पावसाचा अंदाज ठरला खरा; गाढवाने तारले, कोल्हाही मदतीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : हवामानाचा अंदाज नेहमी चुकतोच कसा, असा सवाल वारंवार उपस्थित होत असतो; मात्र यंदा हवामानाचा अंदाज सांगली जिल्ह्यासाठी तंतोतंत खरा ठरला आहे. मान्सूनची वेळेत व दमदार सुरुवात झाल्याने सधन तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात २२ जूनअखेर ४८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित क्षेत्रात पेरण्यांची लगबग सुरू आहे.

मृग नक्षत्रात सूर्याचा प्रवेश होऊन मान्सूनला जोरदार सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन गाढव होते. यात शेतकऱ्यांना अपेक्षेहून चांगला पाऊस लाभला. २१ जूनपासून सूर्य आर्द्रा नक्षत्रात आला असून, त्याचे वाहन कोल्हा आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या नक्षत्रातही चांगल्या पावसाची चिन्हे आहेत. त्यामुळे सुरुवातीची ही दोन्ही नक्षत्रे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सध्या शेती क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. दुष्काळी भागातही यंदा चांगला पाऊस झाला आहे.

कोट

गेल्या अनेक वर्षात जूनमध्ये पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत असे. यंदा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आणि पेरण्यांसाठी पोषक वातावरण झाले आहे.

- अशोक खाडे, शेतकरी कवठेएकंद, ता. तासगाव.

कोट

गेल्या दोन वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यंदाही वेळेत चांगला पाऊस झाल्याने गावात जवळपास ४५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्याही लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे यंदा चांगल्या पिकाची आशा आहे.

- अमोल पाटील, शेतकरी, बस्तवडे, ता. तासगाव.

कोट

पावसामुळे यावेळी आमच्या गावात ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आगामी काळातही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. दुष्काळी भाग असल्याने बऱ्याचदा सुरुवात चांगली होऊन पाऊस दडी मारतो. यंदा तसे होऊ नये, असे वाटते.

- शशिकांत काळगे, रामापूर, ता. जत.

कोट

यावेळी चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी पाेषक वातावरण मिळाले आहे. सध्या सुमारे ४८ टक्के पेरण्या झाल्या असून, उर्वरित क्षेत्रात जूनअखेर पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे. यावेळी कडधान्यांचे उत्पादन जिल्ह्यात वाढण्याची चिन्हे आहेत.

- बसवराज मास्ताेळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

चौकट

तालुकानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)

(२१ जूनपर्यंत)

मिरज १५६४

जत २८१९५

खानापूर १२२

वाळवा ९९१५

तासगाव ३५९

शिराळा २२२७२

आटपाडी १७०३

कवठेमहांकाळ ३०६८

पलूस १०४३

कडेगाव ५५४

चौकट

तालुकानिहाय एकूण पाऊस मि.मी.

मिरज १९१.४

जत १५५.८

खानापूर ७८.५

वाळवा २२१.८

तासगाव २१७

शिराळा २०४.९

आटपाडी ८५.८

कवठेमहांकाळ १२९.८

पलूस १९४.९

कडेगाव १६६.८

चौकट

जिल्ह्यात क्षेत्र व पेरण्या

खरिपाचे क्षेत्र २,७७,६८६

आजअखेर अंदाजे १,३५,०००

Web Title: This year's rain forecast came true; Donkeys rescued, foxes helped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.