येळापुरात डोस कमी, गर्दी जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:24 AM2021-04-13T04:24:52+5:302021-04-13T04:24:52+5:30
फोटो ओळ : येळापूर (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राबाहेर कोरोनाची लस घेण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी हजेरी लावली होती. लोकमत ...
फोटो ओळ :
येळापूर (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राबाहेर कोरोनाची लस घेण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी हजेरी लावली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील प्राथमिक उपकेंद्रातून सहा दिवसात ६०० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. दिवसेंदिवस नागरिकांची संख्या वाढत आहे. यामुळे लसीचे वाढीव डोस देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
चरण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येळापूर येथे उपकेंद्रातून गेल्या आठ दिवसांपासून कोरोना लस दिली जात आहे. येळापूर, बारा वाडी-वस्ती, गवळेवाडी, सावंतवाडी, मेणी या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. यामुळे गर्दी होऊन उपकेंद्रावर ताण पडत आहे. त्यातच चरण उपकेंद्रातून कमी प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने सकाळपासून हजेरी लावलेल्या अनेक महिला-पुरुषांना घरी परतावे लागत आहे.
गेल्या सहा दिवसात ६०० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र लसीचे डोस आणि केंद्राची वेळ वाढवून दिल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार आहे. सध्या लसीअभावी लोकांना हेलपाटे होत आहेत. चरण प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व्ही. एम. जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल बाबर, सुपरवायझर सुरेश धुमाळ, आरोग्य सेविका चंदा महाडिक, आशा स्वयंसेविका सीमा पाटील, लता पाटील, संगीता कांबळे, स्मिता कदम कार्यरत आहेत.