सांगली जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस यलो अलर्ट; सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता

By अशोक डोंबाळे | Published: May 20, 2024 03:18 PM2024-05-20T15:18:16+5:302024-05-20T15:18:48+5:30

पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले.

Yellow alert for two days from tomorrow in Sangli district; Chance of scattered rain in all areas | सांगली जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस यलो अलर्ट; सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता

सांगली जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस यलो अलर्ट; सर्वच भागात तुरळक पावसाची शक्यता

सांगली : दोन दिवस जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. पण पावसाची लक्षणे पाहताच हवामान खात्याने दि. २१, २२ मेपर्यंत सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या पावसाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाऊस कमी आणि वादळी वारेच जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले. यातून उष्णताही प्रचंड वाढली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दि. २१ आणि २२ वादळी पाऊस असला तरी दि. २३ मे रोजी आकाश स्वच्छ असणार आहे.

यादरम्यान जिल्ह्याच्या सर्व भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या दरम्यान, नागरिकांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे, अशी सूचना देखील हवामान खात्याने केली आहे.

Web Title: Yellow alert for two days from tomorrow in Sangli district; Chance of scattered rain in all areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस