सांगली: येरळा, नांदणी नदीला पूर; अनेक पूल पाण्याखाली, वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 04:26 PM2022-10-12T16:26:21+5:302022-10-12T16:26:56+5:30

हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त असला तरी खरीप पिकांचे मोठे नुकसान

Yerla, Nandani river floods in Sangli; Many bridges under water | सांगली: येरळा, नांदणी नदीला पूर; अनेक पूल पाण्याखाली, वाहतूक बंद

सांगली: येरळा, नांदणी नदीला पूर; अनेक पूल पाण्याखाली, वाहतूक बंद

googlenewsNext

कडेगाव : कडेगाव तालुक्यात मंगळवारी रात्रभर धो धो बरसलेल्या पावसाने येरळा व नांदणी नदीला पूर आला. नांदनी नदीच्या सासपडे आणि शिवणी पुलावरून तसेच येरळा नदीच्या शेळकबाव -वांगी तसेच रामापूर कमळापूर पुलावरून पाणी वाहत असल्याने यापुलांवरून वाहतूक बंद करण्यात आली. येरळा व नांदनी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने  पूर पाहण्यासाठी नदीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

रात्रभर संततधार  पाऊस कोसळल्याने काही ठिकाणी शेतातील ताली फुटून पिकांचे नुकसान झाले. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने नगरिकांची तारांबळ उडाली होती. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नांदनी नदीवर असलेला हिंगणगाव तलाव भरून नदीवरील सर्व बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त असला तरी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे आडसाली ऊस भुईसपाट झाले आहेत.

Web Title: Yerla, Nandani river floods in Sangli; Many bridges under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.