येरळेच्या पुरामुळे वसगडे बंधारा झाला ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 07:22 PM2020-10-16T19:22:57+5:302020-10-16T19:27:39+5:30
dam, sangli ,rain, railway दोन दिवस झालेल्या परतीच्या संतत धार व मुसळधार पावसामुळे पलूस व मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.ब्रिटिश कालीन रेल्वे पूलाला होणारा संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून रेल्वे प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री पासून वाहतूक बंद ठेवली आहे.
भिलवडी- दोन दिवस झालेल्या परतीच्या संतत धार व मुसळधार पावसामुळे पलूस व मिरज तालुक्याच्या सिमेवर असणारा वसगडे येथील बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.ब्रिटिश कालीन रेल्वे पूलाला होणारा संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून रेल्वे प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री पासून वाहतूक बंद ठेवली आहे.
पुणे - मिरज रेल्वे मार्ग द्वारे संपूर्ण उत्तर भारत आणि मिरज ते हुबळी, हैदराबाद मार्गाने दक्षिण भारतातीला मिरज जंक्शन ला जोडणारा रेल्वेमार्गावर नांद्रे आणि वसगडे गावाच्या दरम्यान ब्रिटिश कालीन रेल्वे पूल आहे. पावसामुळे या भागातील सर्व ओढे,नाले भरून वाहू लागले असून येरळा नदीला ही मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.
पाटबंधारे विभागाने वसगडे येथे असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्या वरील बर्गे काढून पाण्याला मार्ग दिला नाही. परिणामी बंधारा ओव्हर फलो झाला आणि वाट मिळेल तिकडे पाणी पसरू लागले आहे. येरळा नदी काठावर असणाऱ्या शेतीचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रेल्वे पुलाच्या बाजूला असणारा मातीचा भराव वाहून गेल्याने रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे. दिल्ली हून दक्षिणेत जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्स्प्रेस गाड्या या पुलावरून जात असल्याने धोका नको म्हणून रेल्वेने ही वाहतुक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्या रेल्वेची सांगली, मिरज,कोल्हापूर येथून दोनशे आसपास अधिकारी कर्मचारी यांची टीम तेथे दाखल झाली असून पुलाच्या सुरक्षिततेचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने कामात अडचणी होत आहेत.