कुरळप परिसरातील ऊस कर्नाटकात घालविण्याकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:23 PM2017-10-04T12:23:42+5:302017-10-04T12:26:46+5:30
कर्नाटकातील हालसिध्दनाथ कारखान्याच्या ऊस टोळ्या कुरळप (ता. वाळवा) परिसरात दाखल झाल्या असून, यावर्षी या कारखान्याने पहिली उचल ३000 रुपये जाहीर केल्याने अनेक शेतकºयांनी ऊस कर्नाटकात घालविण्याची तयारी केली आहे.
कुरळप , दि.४ : कर्नाटकातील हालसिध्दनाथ कारखान्याच्या ऊस टोळ्या कुरळप (ता. वाळवा) परिसरात दाखल झाल्या असून, यावर्षी या कारखान्याने पहिली उचल ३000 रुपये जाहीर केल्याने अनेक शेतकºयांनी ऊस कर्नाटकात घालविण्याची तयारी केली आहे.
गतवर्षी या कारखान्याच्या टोळ्या परिसरात आल्या होत्या. वारणा कारखान्याच्या संथ तोडी व राजारामबापू कारखान्याच्या तांत्रिक अडचणीमुळे ऊस तोड विलंबाने होत होती. याचा फायदा उचलत गतवर्षी सुमारे २८ हजार टन ऊस तोड केली होती. त्याचा पहिला हप्ता २७00 रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता, तर दुसरा हप्ता हा ३00 रुपयांनी देऊन गळीत हंगामाची सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या वशी, लाडेगाव, कुरळप परिसरात ८ ते १0 ऊस टोळ्या ट्रॅक्टरसह उतरल्या असून येथील कार्यकर्ते उसाच्या शोधात आहेत.
हा कारखाना ऊस उत्पादकांना टनास अर्धा किलो साखर, तसेच इतर कारखान्यांच्या तुलनेत वजन-काटा बरोबर असणार असल्याचे सांगत आहे. तसेच दहाव्यादिवशी पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या नावावर जमा होणार आहे.
यावर्षी दसºयापूर्वीच या कारखान्याने ऊस तोडी सुरु केल्या होत्या. परंतु वारणा कारखान्याने काही ठिकाणच्या तोडी बंद करण्यास भाग पाडले होते. याबाबत सरकार तसेच शेतकरी संघटना गप्प आहेत. शेतकºयांच्या मालाला भाव मिळत असताना, यांनी लुडबूड करायची काय गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.
झोनबंदी नसताना ऊस उत्पादक कुठेही ऊस घालू शकतो. त्याचा तो अधिकार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. यावर्षी ऊस लवकर जाण्याने रब्बी पिके घेण्याकडे बहुतांश शेतकºयांचा कल आहे.
आमचा ऊस वेळेवर, योग्य वजनाने जात असताना, स्वकष्टाने उभ्या केलेल्या पिकावर इतरांना हक्क दाखविण्याचा काय अधिकार? आमचा ऊस आम्ही कोठेही पाठवू. आमचा ऊस अडविण्याचा अधिकार कोणाला नाही.
सदाशिव पाटील,
ऊस उत्पादक शेतकरी.