आष्ट्यात हळदीचे एकरी साडेतीन लाखाचे उत्पन्न-युवा शेतकऱ्याने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:04 PM2018-03-30T23:04:01+5:302018-03-30T23:04:43+5:30

 The yield of one and a half liters of turmeric in the year-ago-113 quintals of 113 kg of young farmer | आष्ट्यात हळदीचे एकरी साडेतीन लाखाचे उत्पन्न-युवा शेतकऱ्याने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल उत्पादन

आष्ट्यात हळदीचे एकरी साडेतीन लाखाचे उत्पन्न-युवा शेतकऱ्याने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल उत्पादन

googlenewsNext
ठळक मुद्देसेंद्रीय शेती फायदेशीर; तरुणांपुढे ठेवला आदर्श

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील योगेश शांतिकुमार चौगुले या युवा शेतकºयाने ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल सेलम हळदीचे उत्पन्न घेतले. एकरी ३ लाख ६६ हजार उत्पादन घेऊन योगेश चौगुले याने तरुण शेतकरी बांधवांसमोर आदर्श घालून दिला आहे.

आष्टा-तासगाव रस्त्यावर चांदोली वसाहतीनजीक चौगुले यांचा मळा आहे. फोंड्या माळावर शेती करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. सुमारे १३ एकर शेती असूनसुद्धा शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. १९८७-८८ पर्यंत शेती जिरायत होती. या काळात शांतिकुमार यांनी ९१-९२ मध्ये पोल्ट्री व्यवसाय तसेच संकरित गाईपालन केले. यात अत्यल्प नफा मिळाला. २००१ नंतरच्या काळात दोन विहिरी खोदून शेती बागायत करण्यात यश आले. काही काळात पाणी पुरवठा योजना सुरू झाली. थोड्या वर्षात ऊस शेती बहरू लागली. ऊस उत्पादन ३५ ते ४० टन इतके मिळत होते. पारंपरिक पद्धतीने शेती सुरु असताना ऊस उत्पादन अपेक्षित मिळत नव्हते. याचवेळी हळद लागवड करण्यास सुरुवात झाली.

बाळासाहेब चौगुले, शांतिकुमार चौगुले यांना शेतीत योगेश मदत करू लागला. बालपणापासून शेतीची आवड असल्याने शेतातील सर्वच कामात योगेश पुढे होता. २०१५-१६ मध्ये २ एकरमध्ये सेलम हळदीचे ३४ क्विंटल उत्पन्न मिळाले, २०१६-१७ मध्ये १०० गुंठ्यात ७६ क्विंटल उत्पन्न मिळाले.योगेश शेतीत आणखी उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करीत असताना आष्टा येथील एकवीरा मंदिरात आयोजित हळद उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरात हळदीच्या शेतीचे मार्गदर्शन मिळाले.शिबिरातील मार्गदर्शनानुसार शेतीत उभी आडवी नांगरट करून साडेचार फूट सरी सोडली. शेतात शेणखत विस्कटले. ९ ते १० इंचावर सव्वा फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने सेलम हळद लागवड केली व ठिबक सिंचनने पाणी दिले.सेलम हळद बियाणासाठी ३६ हजार, रासायनिक व सेंद्रीय खताला १६ हजार ५००, भांगलण १६ हजार, पूर्वमशागत ७ हजार, आंतरमशागत ३४०० व हळद काढणी व शिजवणे ६२७४ रुपये, असा एकूण एकरी १ लाख ३५ हजार १७४ रुपये खर्च आला. चौगुले यांच्या ११३ गुंठ्यात ११७ क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळाले. याचे बाजारभावाप्रमाणे १० लाख ३६ हजार ६६० रुपये मिळाले. एकरी ३ लाख ६६ हजार ९९४ रुपये उत्पन्न मिळाले. यातून १ लाख ३५ हजार १७४ रुपये खर्च वजा जाता, २ लाख ३१ हजार ८२० रुपये निव्वळ नफा झाला. योगेश चौगुले यांना बिभीषण पाटील, वडील शांतिकुमार, आजोबा बाळासाहेब चौगुले, दोन काका व कुटुंबातील सर्वांचे सहकार्य लाभले.

योगेश चौगुले म्हणाले, शेती आधुनिक पद्धतीने करणे काळाची गरज आहे. यासाठी बिभीषण पाटील यांच्यासारखे माती, पीक व उत्पादन वाढीसाठी परिपूर्ण माहिती देणारे मार्गदर्शक गरजेचे आहेत. रासायनिक खताबरोबर सेंद्रीय खते पीक उत्पादन वाढीला पोषक ठरतात. त्याचा पिकाला फायदा झाला.

नियोजनाचा फायदा
हळदीसाठी अमोनियम सल्फेट १, पोटॅश ३, २०; २०- १, डी ए पी १, सिंगल सुपर फॉस्फेट २ पोती, लिंबोळी पेंड ८ बॅग, सेंद्रीय खत ३२० किलो, गंधक २५ किलो अशी रासायनिक व सेंद्रीय खते दिली. तसेच गरजेनुसार विद्राव्य खते दिली. हळदीच्या पिकात स्वीटकॉर्न मका घेतला. त्याचे ३३ हजार मिळाले. वेळच्यावेळी आंतरमशागत करून पाणी दिल्याने हळदीचे पीक बहरले.

Web Title:  The yield of one and a half liters of turmeric in the year-ago-113 quintals of 113 kg of young farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.