तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 07:21 PM2023-06-05T19:21:05+5:302023-06-05T19:27:20+5:30

भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला

You broke my house, I will break the Shinde Fadnavis alliance; Shashikant Shinde warning | तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

googlenewsNext

विटा : भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला आहे. आज त्यांनी माझ्या भावाला पक्षात घेऊन माझे घर फाेडले आहे. लवकरच मी शिंदे-फडणवीस युती ताेडून दाखवताे, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी विटा येथे दिला.

विटा येथे रविवारी खानापूर तालुका राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, ॲड. संदीप मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, हर्षवर्धन बागल, शहराध्यक्ष अविनाश चोथे उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, देशातील विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे काम फक्त शरद पवार करू शकतात. ही लढाई सोपी नाही. सत्तेतील लोक निवडणुका जिंकण्याचे अनेक फंडे वापरत असतात. अनेक राज्ये त्यांनी सत्तेच्या माध्यमातून घेतली. हे चित्र बदलायचे असेल तर सांगलीचा खासदार आपल्या विचारांचा असला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. बुथ कमिट्या सक्षम करा.

अरुण लाड म्हणाले, सदाशिवराव पाटील यांची संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्यांची सुप्त ताकद जागृत केली पाहिजे. त्यासाठी बूथ कमिटी सक्षम करण्याची गरज आहे.

माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, दोन वेळा मी आमदार होतो, दोनदा पराभव झाला. पुढची निवडणूक योग्य वेळी, योग्य पद्धतीने करू. आमच्याकडून पक्ष संघटनेला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेत आहोत. परंतु तुम्हाला विश्वास देण्यात आम्ही कमी पडतोय की आमच्यावर विश्वास ठेवण्यात तुम्ही कमी पडताय? याचा विचार झाला पाहिजे.

जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सुशांत देवकर यांनी मनाेगत व्यक्त केले.

आज आटपाडी, विसापूर सर्कलमध्ये पक्षाचे काय चालले आहे? आटपाडी सरळ करू शकला तरच पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल. अन्यथा अपेक्षा ठेवू नका. विसापूर सर्कलमध्ये समन्वय ठेवा म्हणून तीन वर्षांपासून सांगतोय. ते आले तर ठीक, नाही तर निर्णय घ्यावा लागेल, असे परखड मत सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: You broke my house, I will break the Shinde Fadnavis alliance; Shashikant Shinde warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.