मिरजेत ४५० रुपये उधारीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:51+5:302020-12-07T04:20:51+5:30
मृत गोविंदाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी असून तो आईसोबत समतानगर येथे वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री तीन वाजता समतानगर येथे ...
मृत गोविंदाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी असून तो आईसोबत समतानगर येथे वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री तीन वाजता समतानगर येथे जुन्या हरिपूर रस्त्यावर हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला व त्यांनी पलायन केले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर व गांधी चाैक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
गोविंदासाेबत रात्री शक्ती खाडे व मिलिंद सादरे हे दोघेजण असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन केवळ दोन तासात खून उघडकीस आणला.
मृत गोविंदाकडून दोन महिन्यापूर्वी शक्ती खाडे याने ४५० रुपये उधार घेतले होते. मात्र शक्ती हा उधारी परत देण्यास टाळाटाळ करीत हाेता. यामुळे गोविंदाने शक्तीचा मोबाईल काढून घेतला होता. मोबाईल काढून घेतल्याने रागावलेल्या शक्तीने गोविंदाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने रविवारी रात्री मिलिंद सादरे यास सोबत घेऊन गोविंदास मद्यपानासाठी बोलावले. गोविंदास भरपूर दारु पाजल्यानंतर दोघांनी त्याचा गळा चिरून व डोक्यात दगड घालून खून केल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले. गोविंदाच्या खूनप्रकरणी शक्ती खाडे व मिलिंद सादरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिरजेतील समतानगर, माणिकनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ होत असून दोन दिवसांपूर्वी येथे गुन्हेगारांच्या टोळक्याने खंडणीसाठी समीर शेख या तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.
चाैकट
माेबाईल न दिल्याने राग अनावर
मृत गोविंदास दारू पाजून शक्तीने मोबाईल परत देण्याची मागणी केली. मात्र उधारी मिळेपर्यंत मोबाईल देणार नसल्याचा गोविंदाने पवित्रा घेतल्याने शक्तीला राग अनावर झाला. मिलिंद सादरे याने गोविंदाचे हात मागून पकडले व धारदार चाकूने गळ्यावर मानेवर, डोक्यावर, पायावर वार केले. खुनाची शक्तीने कबुली दिली आहे.
फाेटाे : ०६ गाेविंदा मुत्तीकाेळ