बागणीचा युवक उखळू धबधब्यात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:07 AM2017-07-19T00:07:12+5:302017-07-19T00:07:12+5:30

बागणीचा युवक उखळू धबधब्यात वाहून गेला

The young man of the garden was carried away in a dense cemetery | बागणीचा युवक उखळू धबधब्यात वाहून गेला

बागणीचा युवक उखळू धबधब्यात वाहून गेला

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : शाहुवाडी तालुक्यातील उखळू धबधबा (म्हातारकडा) पाहण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांपैकी एकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर (वय ३५, रा. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजता खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर, मेहबूब बाबासाहेब फकीर, दिलीप सदाशिव नगारे, राजेंद्र बाबूराव शेळके, प्रदीप रघुनाथ माळी (सर्व रा. बागणी, ता. वाळवा) व अशोक माळी (साखर कारखान्याजवळ, सांगली) हे उखळू (ता. शाहूवाडी) येथील निसर्गरम्य धबधबा पाहायला दुचाकीवरून गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते उखळू येथे पोहोचले. त्यातील पाचजण पाण्याच्या प्रवाहात उतरले असताना, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर हा प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना बाकीचे पाच जणही वाहून जाऊ लागले. पण प्रसंगावधान राखून सर्वजण डोहात दगडांचा आधार घेऊन व झाडांच्या फांद्या पकडून बसले. खुदबुद्दीनला वाचविताना त्याचा भाऊ मेहबूब जखमी झाला.
याची माहिती मिळताच उखळू येथील स्थानिक युवराज पाटील,भगवान अनुते, सुरेश कुलकर्णी, रमेश पाटील व सहकाऱ्यांनी परिश्रम करून सर्वांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. जखमींना तातडीने आपत्कालिन रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल आर. गाडे, धनाजी खराटे यांच्याबरोबर उखळूचे माजी सरपंच मारूती वडाम, शित्तूरचे पोलिस-पाटील दीपक भोसले यांनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच शाहुवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
सध्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हा दुर्गम परिसर असल्याने वाहतुकीची कोणतीही सुविधा नसल्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेता आलेला नाही. बुधवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: The young man of the garden was carried away in a dense cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.