तक्रार मागे घेण्यासाठी तरुणास चाकूने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:51+5:302021-05-26T04:26:51+5:30
सांगली : पोलिसांत दिलेली तक्रार मिटविण्यासाठी व झालेला खर्च देण्यासाठी तरुणास चाकूने मारून जखमी करण्यात आली. या प्रकरणी गणेश ...
सांगली : पोलिसांत दिलेली तक्रार मिटविण्यासाठी व झालेला खर्च देण्यासाठी तरुणास चाकूने मारून जखमी करण्यात आली. या प्रकरणी गणेश परगोंडा हत्तीकर (वय २६, रा. विठ्ठलनगर, सांगली) याने अभिषेक खांडेकर, प्रथमेश सवताळे (दोघेही रा. वारणाली, सांगली) व धनंजय काटे (रा. गेस्ट हाऊसजवळ, सांगली) यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नेमीनाथनगर येथील कल्पद्रुम मैदानाजवळ हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २०१७ मध्ये संशयितांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मिटविण्यासाठी चर्चेसाठी त्यांनी गणेशला कल्पद्रुम मैदानाजवळ बोलावले होते. यावेळी त्यांनी तक्रार मिटविण्याबरोबरच खर्च दे असे म्हटल्यानंतर गणेशने त्यास माझा या केसशी काहीही संबंध नाही; त्यामुळे मी खर्च देणार नाही, असे सांगितले; यावरून चिडून जाऊन संशयितांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एका संशयिताने काठीने त्यास मारले; तर दुसऱ्या संशयिताने चाकूने मारून त्याला जखमी केले. यावेळी भांडणे सोडविताना फिर्यादी गणेशनचा मित्र बालाजी कोळेकर यालाही संशयितांनी शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.