महाअंनिसच्या विज्ञाननिष्ठ कार्यात तरुणांनी सहभागी व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:23+5:302021-08-12T04:30:23+5:30
इस्लामपूर येथे महाअंनिसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रा. श्यामराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. डॉ. प्रमोद गंगनमाले, प्रकाश ...
इस्लामपूर येथे महाअंनिसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रा. श्यामराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. डॉ. प्रमोद गंगनमाले, प्रकाश कांबळे, प्राचार्य सुदाम माने, प्रा. बी.आर. जाधव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जनमानसामध्ये रुजलेली आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम अंनिसकडून सातत्याने केले जात आहे. तरुणांनी या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष व अंनिसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात महाअंनिसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संकल्प व निर्धार मेळाव्यात प्रा. पाटील बोलत होते. माजी प्राचार्य डॉ. सुदाम माने अध्यक्षस्थानी होते.
प्रा. बी.आर. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या संपादक मंडळातील प्रा. डॉ. नितीन शिंदे, प्रा. एकनाथ पाटील, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, त्र्यंबकेश्वर मिरजकर यांचा सत्कार करण्यात आला. राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, सांस्कृतिक विभागाचे कार्यवाहक योगेश कुदळे, प्रा. सतीश चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
तक्षशीला विज्ञान केंद्राच्या वतीने प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, जितेंद्र भिलवडीकर यांनी संपादक मंडळाचा गौरव केला. प्रा. डॉ. प्रमोद गंगनमाले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विष्णू होनमोरे यांनी आभार मानले. अजय भालकर, जगन्नाथ नांगरे, प्रा. तृप्ती थोरात, प्रशांत इंगळे, एम.डी. जाधव, विश्वास सुतार, प्रताप पाटील यांनी संयोजन केले.