तरुणांनी उद्योग, व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:06+5:302020-12-05T05:04:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडेपूर : कडेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या आशीर्वाद एक्झिक्युटिव्ह या हॉटेलचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार ...

Young people should turn to industry and business | तरुणांनी उद्योग, व्यवसायाकडे वळावे

तरुणांनी उद्योग, व्यवसायाकडे वळावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेपूर : कडेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या आशीर्वाद एक्झिक्युटिव्ह या हॉटेलचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.

देशमुख म्हणाले, तरुणांनी नोकरी न करता लहान-मोठे व्यवसाय केले पाहिजेत. कोरोना साथीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे समाजात बेराेजगारी वाढली आहे. मात्र तरुणांनी संकोच किंवा लाज न बाळगता लहान-मोठे व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावला पाहिजे. कडेगाव तालुक्यात शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. त्यामुळे तालुक्यात हॉटेल व्यवसायास चांगले दिवस आले आहेत.

कार्यक्रमास युवा नेते डॉ. जितेश कदम, पंचायत समिती सभापती मंगल क्षीरसागर, राज्य सराफ असोसिएशनचे संचालक सुनील गाढवे, नेर्लीचे माजी सरपंच सुनील पाटील, शिवाजी पवार, उद्योजक अनमोल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते. संचालक चंद्रशेखर काटकर यांनी स्वागत केले. गिरीश काटकर यांनी आभार मानले.

फाेटाे : ०२ कडेपुर १

Web Title: Young people should turn to industry and business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.