तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:11 AM2021-01-24T04:11:56+5:302021-01-24T04:11:56+5:30
नेर्ले : शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे औषध फवारणी व गट शेती हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानासह स्वीकारणे काळाची गरज आहे. ...
नेर्ले : शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे औषध फवारणी व गट शेती हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानासह स्वीकारणे काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान तरुणांमध्ये रूजले पाहिजे असे मत युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे शेतकरी परिसंवाद व राजारामबापू कार्यक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील होते.
प्रतीक पाटील म्हणाले, सध्या अति पाणी वापरामुळे जमीन क्षारपड व नापिक होत आहे. यासाठी एकरी पन्नास हजार रुपये खर्च असून सुरूवातीला शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये कारखान्याकडे भरून नंतर ३३ महिन्यात उर्वरित रकमेची परतफेड करायची आहे.
ऊस विकास अधिकारी सुभाष जमदाडे यांनी ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे औषध फवारणी व गट शेती बाबत सविस्तर माहिती दिली. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रोहित पाटील व राजेंद्र पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा सत्कार केला. यावेळी आनंदराव पाटील, सरपंच छाया रोकडे, उपसरपंच विश्वास पाटील, संभाजी पाटील, सुभाष पाटील, आप्पासाहेब कदम, जयकर नांगरे-पाटील, प्रदीप पाटील,केदारवाडीचे सरपंच अमर थोरात आदी उपस्थित होते. संभाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच विश्वास पाटील यांनी आभार मानले.
फोटो-२३नेर्ले१
फोटो ओळी : नेर्ले (ता. वाळवा) येथे शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवराज पाटील, आनंदराव पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील उपस्थित होते.