समाजस्वास्थ्यासाठी तरुणांनी समाजसेवेकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:37+5:302021-01-22T04:24:37+5:30

इस्लामपूर : आजची तरुण पिढी क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागून भरकटत चालली आहे. यासाठी आजच्या तरुण पिढीला समाजसेवेची ओढ लागली ...

Young people should turn to social service for social health | समाजस्वास्थ्यासाठी तरुणांनी समाजसेवेकडे वळावे

समाजस्वास्थ्यासाठी तरुणांनी समाजसेवेकडे वळावे

Next

इस्लामपूर : आजची तरुण पिढी क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागून भरकटत चालली आहे. यासाठी आजच्या तरुण पिढीला समाजसेवेची ओढ लागली पाहिजे, तरच उद्याचा तरुण व उद्याची समाजव्यवस्था टिकेल, असे मत भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे यांनी व्यक्त केले.

निशिकांतदादा युथ फौंडेशनच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकारिणी पदाधिकारी निवड कार्यकमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तरुण कीर्तनकार ह.भ.प. अनिल देऊळकर महाराज होते. यावेळी अक्षय पाटील, मधुकर हुबाले, चंद्रकांत पाटील, अभिजित पाटील, अनिकेत पाटील, सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रांजली अर्बन निधी बॅँकेचे अध्यक्ष संदीप सावंत, फौंडेशनचे सचिव विश्वजित पाटील, डॉ. उदयसिंह नाईक, पांडुरंग गायकवाड, विश्वजित गिरीगोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी निशिकांतदादा युथ फौंडेशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी वैभव हिरवे, शिरोळ तालुका अध्यक्षपदी नितीन पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्षपदी संदीप यादव यांची, तर सांगली जिल्हा अध्यक्षपदी रोहितराज पाटील, सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी अनिळ देऊळकर महाराज, वाळवा तालुका अध्यक्षपदी प्रतीक घारे, शिराळा तालुका अध्यक्षपदी शैलेश पाटील यांची निवड करण्यात आली.

फोटो - २१०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर निवड न्यूज

इस्लामपूर येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार धैर्यशील मोरे, अक्षय पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

Web Title: Young people should turn to social service for social health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.