नेर्ले येथे अपघातात तरुणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:41+5:302020-12-25T04:22:41+5:30
विजय आनंदा पावलेकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, अश्विनी पावलेकर ही वडोली-निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथे मामाकडे राहत होती. ती गुरुवारी ...
विजय आनंदा पावलेकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, अश्विनी पावलेकर ही वडोली-निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथे मामाकडे राहत होती. ती गुरुवारी सकाळी काही कामानिमित्त कऱ्हाड येथून दुचाकी (एमएच ५० जी ३५०१)ने पेठच्या दिशेने निघाली होती. नेर्ले येथील हॉटेल मनीकंडनसमोर ट्रॅक्टरच्या पुढे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (केए १९ एबी १९०६)ने दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आल्याने अश्विनीचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. कासेगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याबाबत विजय आनंदा पावलेकर याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून ट्रकचालक महंमद अकबर एमशेख अब्दुल कादर (वय २६, रा. पूदु बंटवाल, जि. मंगलूर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाैकट
परिसरात हळहळ
अश्विनी पावलेकर पदवीधर होती. ती कऱ्हाड-मलकापूर परिसरात एका विमा कंपनीच्या कार्यालयात कामास होती. वडिलांचे छत्र हरपल्याने ती आई व भावासह वडोली-निळेश्वर (कऱ्हाड) येथे मामांकडे वास्तव्यास होती. गरीब व मनमिळाऊ स्वभावामुळे ती परिचित होती. तिच्या अपघातामुळे कऱ्हाड, येडेनिपाणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो-२४रेठरेधरण०१
फोटो ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त दुचाकी.