युवा पिढीने पर्यावरणासाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:47+5:302021-06-06T04:20:47+5:30
विटा : आज सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास होतानाचे भयानक चित्र निर्माण झाले आहे. वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाकडे सध्या मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होताना ...
विटा : आज सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास होतानाचे भयानक चित्र निर्माण झाले आहे. वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाकडे सध्या मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे युवा पिढीने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेऊन आगामी काळात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अच्युतराव यादव यांनी केले.
खानापूर विधानसभा मतदारसंघातील पाडळी (ता. तासगाव) येथे शनिवारी जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून सिध्द युथ फौंडेशनच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शाळेच्या आवारात युवा फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळ, वड, अशोक आदीप्रकारच्या झाडांचे रोपण केले. यावेळी उपसरपंच अजित पाटील, माजी सरपंच किशोर गायकवाड, पंकज यादव, धनाजी पाटील, चंद्रकांत पाटील, दयानंद सुर्वे, देवदास यादव, रफिक मुलाणी, तेजप्रकाश ठोंबरे, अमित यादव, नवनाथ पाटील, वैभव केंगार, चंद्रकांत सावंत आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ०५०६२०२१-विटा-पाडळी
ओळ : पाडळी येथे शनिवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अच्युतराव यादव, उपसरपंच अजित पाटील, किशोर गायकवाड, पंकज यादव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.