ट्रकखाली चिरडून तरुण जागीच ठार
By admin | Published: December 29, 2015 12:33 AM2015-12-29T00:33:22+5:302015-12-29T00:33:22+5:30
कंपनीतील काम आटोपून घरी जाणारा किरण लालचंद राठोड (वय 30, रा.फोपनार ता.ब:हाणपूर) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने येणा:या ट्रकखाली चिरडून जागीच ठार
कवठेमहांकाळ : ताकारी आणि टेंभू योजनेतील शेतकरी पैसे भरतात, म्हैसाळसाठी दुजाभाव करता येत नाही. आता ‘म्हैसाळ’ चालविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून ही योजना कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. वीज बिलामध्ये सवलतीसाठी प्रयत्न केले जातील. तातडीने योजना सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. टंचाईच्या कामासाठी आणि पाणी योजना बंद पडल्यास ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समिती सभागृहात टंचाई आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ते बोलत होते. म्हैसाळ योजनेत कोणतेही राजकारण नाही. लोकांनी पैसे भरून सहकार्य करावे. ढालगाव भागातील गावासाठी टेंभू योजनेच्या पाण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तो तातडीने मिळवून देण्यात येईल. येत्या दोन महिन्यांच्या काळात टेंभूचे पाणी नागजच्या ओढ्यामध्ये टाकण्यात येईल. त्याचबरोबर अन्य कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. प्रादेशिक पाणी योजना असलेल्या काही गावांतील पाणीपट्टी वसुली अत्यल्प आहे. भविष्यात वीज कनेक्शन तोडण्यामुळे पाणी बंद झाल्यास ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा खासदार पाटील यांनी दिला.
कवठेमहांकाळ प्रादेशिक पाणी योजनेच्या देखभाल दुरूस्तीचा ठेकेदार बदलावा, अशी मागणी कवठेमहांकाळचे सरपंच सुनील माळी यांनी केली. ग्रामसेवकांनी पाणीपट्टी वसुलीसाठी कोणतेही कारण सांगू नये. जलस्वराज्यमधून झालेल्या आरेवाडी येथील पाणी योजनेच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
सभापती वैशाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी सतीश गाडवे यांनी आढावा सादर केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अजय माने, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील, पंचायत समिती सदस्य अनिल शिंदे, पतंग यमगर, शिवाजी चंदनशिवे, दादासाहेब कोळेकर, हायूम सावनूरकर, दयानंद सगरे, अनिल लोंढे, रमेश साबळे, सुखदेव पाटील, औदुंबर पाटील, उदयराजे भोसले, समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवरे, तहसीलदार सचिन डोंगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे उपस्थित होते. (वार्ताहर)
वेगळी भूमिका चुकीची : दोन दिवसांत बैठक
म्हैसाळ योजनेमध्ये कोणतेही राजकारण नाही. त्यामुळे अन्य कोणीही राजकीय सोयीची भूमिका घेऊ नये. विसापूर-पुणदीसाठी वेगळी आणि म्हैसाळसाठी वेगळी भूमिका घेणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांनी ही योजना आपल्यासाठी आहे, हे ओळखून पैसे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा. एकाच जिल्ह्यात वेगवेगळा न्याय असू शकत नाही. अन्य दोन योजना पैसे भरून सुरू आहेत; मात्र म्हैसाळच्या कार्यक्षेत्रातील लोक ते भरत नाहीत, हे चुकीचे आहे. टंचाईची सवलत वीज बिलामध्ये देण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्यासमवेत दोन दिवसांत बैठक होणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.