तू ये रे पावसा... व्याकुळ बळीराजा देतोय हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:50 AM2019-06-05T11:50:15+5:302019-06-05T11:52:26+5:30

उन्हाच्या आगीने भाजून निघालेली धरणी, फोंड्या माळरानावर चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जितराबं, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आ-वासून आभाळाकडे आस लावून बसलेला बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी  तू ये रे पावसा...म्हणून आर्त हाक देत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे.

You're raining ... The victim is sacrificing the wounds | तू ये रे पावसा... व्याकुळ बळीराजा देतोय हाक

तू ये रे पावसा... व्याकुळ बळीराजा देतोय हाक

Next
ठळक मुद्देतू ये रे पावसा... व्याकुळ बळीराजा देतोय हाककवठेमहांकाळ तालुका : हजारो हेक्टरवरील खरिपाची पेरणी रखडली

अर्जुन कर्पे

कवठेमहांकाळ : उन्हाच्या आगीने भाजून निघालेली धरणी, फोंड्या माळरानावर चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जितराबं, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आ-वासून आभाळाकडे आस लावून बसलेला बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी  तू ये रे पावसा...म्हणून आर्त हाक देत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे.

वर्षानुुवर्षे कवठेमहांकाळ तालुका हा दुष्काळाच्या आगीत होरपळत आहे. रखडलेल्या सिंचन योजना, त्यातून होणारा अनियमित पाणीपुरवठा, आटलेले पाण्याचे स्रोत, गतवर्षी असमाधानकारक, अत्यल्प झालेला पाऊस, यामुळे चालूवर्षी दुष्काळाचे गर्द संकट तालुक्यावर आले आहे.

जून उजाडला तरी मान्सूनने अद्याप डोळा उघडलेला नाही. तलाव कोरडे पडल्याने शेतकरी तलावातूनही पाणी उचलू शकत नाही. पावसाळा ऋतू सुरू झाला तरी, टँकरच्या खेपा वाढतच आहेत. जनावरांच्या ४ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. अद्यापही छावण्यांची मागणी वाढतच आहे. स्वत: जगायचे, कुटुंब जगवायचे, की जनावरे जगवायची? या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यावरील आर्थिक कर्जाचे ओझे वाढतच चाललेले आहे. पाऊस-पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात ७५ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरिपाच्या हंगामात तालुक्यात ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्य, मूग, उडीद, तूर, इतर कडधान्ये, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आदी पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु पाऊसच अद्याप सुरू झाला नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आभाळाकडे डोळे लावून बसण्याखेरीज शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.

तालुक्यात २२ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र हे खरिपाखालील पेरणी क्षेत्र आहे. यामध्ये पाण्याविना शेतकरी काहीच करू शकत नाही. कोपलेल्या निसर्गाला, दडी मारलेल्या वरुणराजाला व्याकुळ आणि हतबल बळीराजा, हंबरणारी जनावरे, तापलेली धरणी, रानातील पाखरे ह्यतू ये रे पावसाह्ण म्हणून आर्त हाक मारू लागली आहेत.

 

Web Title: You're raining ... The victim is sacrificing the wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.