सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाºया तरुणास कर्नाटकात अटक; विटा पोलिसांची कारवाई- अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 07:38 PM2017-11-18T19:38:38+5:302017-11-18T19:42:55+5:30
विटा : सोशल मीडियाच्या व्हॉटस्-अॅप ग्रुपवर महापुरुषाच्या फोटोची बदनामी करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाºया धोंडेवाडी-गोरेगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथील दीपक शिवाजी डोईफोडे (वय १८) या तरुणास विटा पोलिसांनी शनिवारी कर्नाटक राज्यातील चिकमंगरूळ येथे अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.विटा येथील ऋतिक कांबळे या तरुणाने तयार केलेल्या ‘तेरी मेरी यारी’ या व्हॉटस्-अॅप गु्रपचा सदस्य असलेल्या संशयित दीपक डोईफोडे या माथेफिरू तरुणाने व्हॉटस्-अॅप ग्रुपवर महापुरुषाच्या प्रतिमेची बदनामी करून आक्षेपार्ह पोस्ट गुरुवारी व्हायरल केली होती. त्यामुळे विटा शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी डोईफोडे याच्याविरुध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा दाखल होताच विटा पोलिसांचे पथक डोईफोडे याच्या मोबाईल लोकेशनवरून कर्नाटक राज्यातील चिकमंगरूळ शहरात शुक्रवारी पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याला शनिवारी दुपारी विटा पोलिसांनी अटक करून त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. डोईफोडे याचे मूळ गाव सातारा जिल्'ातील धोंडेवाडी-गोरेगाव (ता. खटाव) असून, तो सध्या कर्नाटक राज्यातील चिकमंगरूळ येथे सोने-चांदी गलाई व्यवसायात कामगार म्हणून काम करीत असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिली. पोलिस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.