लक्ष्मीनगरमधील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:42+5:302021-05-25T04:29:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगलीतील जुना बुधगाव रोड लक्ष्मीनगरमधील १९ वर्षीय युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली. त्या युवकाचे अतुल ...

Youth commits suicide under train in Laxminarayan | लक्ष्मीनगरमधील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

लक्ष्मीनगरमधील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

संजयनगर : सांगलीतील जुना बुधगाव रोड लक्ष्मीनगरमधील १९ वर्षीय युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली. त्या युवकाचे अतुल चंद्रकांत गोसावी (वय १९, रा. जुना बुधगाव रोड, लक्ष्मीनगर, सांगली) नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेची नोंद सांगली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आधिक माहिती अशी, मृत अतुल गोसावी हा एका भंगार दुकानात कामाला होता. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने तो घरीच होता. घराची परिस्थिती तशी बेताची होती. रविवारी दुपारी तो दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास जेवण करून घरातून बाहेर पडला होता. पुन्हा तो घरी फिरकला नाही. संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान रेल्वेखाली त्याने आत्महत्या केली. माधवनगर रेल्वे फाटकापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह दोन्ही रेल्वे रूळाच्या मध्यभागी पडला होता. रेल्वे पोलीस, संजयनगर आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांनी आणि मृत अतुलच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृत अतुल याचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Youth commits suicide under train in Laxminarayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.