वारणा पाणी योजनेसाठी युवा मंच आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:19+5:302021-03-23T04:27:19+5:30

लेंगरे म्हणाले, उन्हाळ्यामध्ये कृष्णा नदी कोरडी पडल्याने सांगली व कुपवाडला पाणी टंचाई निर्माण होते. तसेच कृष्णेच्या उगमापासून ते सांगलीतील ...

Youth Forum aggressive for Warna water scheme | वारणा पाणी योजनेसाठी युवा मंच आक्रमक

वारणा पाणी योजनेसाठी युवा मंच आक्रमक

Next

लेंगरे म्हणाले, उन्हाळ्यामध्ये कृष्णा नदी कोरडी पडल्याने सांगली व कुपवाडला पाणी टंचाई निर्माण होते. तसेच कृष्णेच्या उगमापासून ते सांगलीतील जॅकवेलपर्यंत १३ साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी कृष्णा नदीत मिळसते. अनेक गावांचे सांडपाणीही नदीतच सोडले जात आहे. त्यामुळे माजी मंत्री मदन पाटील यांनी वारणा नदीतून शुध्द व बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी ‘वारणा उद्भव पाणी योजना’ तयार केली. ती शासनाकडून मंजूर करून घेतली व त्यासाठी निधी आणला. मात्र मध्यंतरही महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर या योजनेला ब्रेक लागला. या योजनेतील माळगंबला जलशुध्दीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्था आदी कामे झाली आहेत. आता केवळ वारणेतून पाणी उचलून ते माळ बंगल्यापर्यंत आणणे हा एकच टप्पा बाकी आहे. वारणा उद्भव पाणी योजना पूर्ण करावी, अशी मागणी पालकमत्री जयंत पाटील व कृषी व सहकार राज्य मंत्री विश्वजित कदम यांच्याकडे मदन पाटील युवा मंचच्यावतीने करण्यात येणार आहे.

तसेच रस्त्यावरचे बाजार खुल्या भूखंडावर स्थलांतरित करावे तसेच शहरासाठी एक मध्यवर्ती व सर्व सोयींनीयुक्त बहुमजली भाजी मंडई उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चौकट

हिराबाग जलशुध्दीकरण केंद्र सुरू करा

आनंद लेंगरे म्हणाले, सांगली व कुपवाड शहरासाठी सध्या माळबंगला जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी दिले जाते. तरीही शहराला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. हे टाळण्यासाठी हिराबाग येथील जलशुध्दीकरण केंद्र पूर्ववत सुरू करावे. या केंद्रातून अर्ध्या सांगलीला पाणी पुरवठा होतो. माळबंगल्याला समांतर यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

Web Title: Youth Forum aggressive for Warna water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.