युवक हो... करिअरला मिळणार योग्य दिशा
By Admin | Published: June 9, 2016 01:08 AM2016-06-09T01:08:09+5:302016-06-09T01:15:32+5:30
‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ : सांगलीत १० ते १२ जूनपर्यंत प्रदर्शन; एकाच छताखाली सर्व प्रश्नांची उत्तरे
सांगली : दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. काहीजणांना काय करायचे ते पक्के ठावूक असले तरी, कोणता कोर्स कोठून करावा, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अनेकांना नेमके काय करावे हे अजूनही सुचत नाही. अशा अनेक प्रश्नांवर सर्वव्यापी उपाय व करिअर मार्गदर्शन मिळणार आहे, ते ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ मध्ये.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे यंदाही शुक्रवार, दि. १० ते १२ जूनदरम्यान सांगलीत राममंदिर चौकातील कच्छी जैन भवन येथे ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ चे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे सहप्रायोजक अण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, आष्टा आणि शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, यड्राव, तर दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड व ट्रिनिटी हे साहाय्यक प्रायोजक आहेत.
केवळ बारावी नव्हे, तर सर्वच विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन फायद्याचे ठरणार आहे. यामधून पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपसुकच मिळतील. महाविद्यालय, मेडिकल, इंजिनिअरिंग आर्किटेक्ट, फॅशन, आयटीआयची माहिती येथे मिळेल. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. (प्रतिनिधी)
व्याख्यानांची मेजवानी
अॅस्पायर प्रदर्शनांतर्गत दि. १० जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता दीपस्तंभ फौंंडेशन, जळगावचे यजुवेंद्र महाजन हे ‘करिअर कसे निवडावे’, ‘१० वी, १२ वी नंतर काय?’, ‘एमपीएससी व युपीएससी परीक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.