युवकांनी यशस्वी उद्योजक बनावे : सुधीर गाडगीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:48 PM2019-09-14T13:48:02+5:302019-09-14T13:49:48+5:30
युवकांनी रोजगार-स्वयंरोजगाराच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनावे असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
सांगली : युवकांनी रोजगार-स्वयंरोजगाराच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनावे असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली मार्फत वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, टिळक सभागृह कॅडमीक कॉम्प्लेक्स, सांगली येथे कौशल्य परिवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात होते.
यावेळी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी, वालचंद कॉलेजचे प्र. संचालक पी. जी. सोनवणे, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेद्र यादव, पलूस औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य गुरव, प्रसिध्द उद्योगपती देवानंद लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, मार्गदर्शन मेळाव्यांचा उद्देश शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करुन देणे असा आहे. स्टार्टअप, मुद्रा योजना, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडील योजना, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजना, बँक ऑफ इंडिया स्टार अशा योजनांची माहिती घेवून त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तज्ञांनी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांनी आभार मानले.