बायपास रस्त्यावर तरुणास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:57+5:302021-07-21T04:18:57+5:30
सांगली : येथील बायपास रस्त्यावरील बालाजी ऑटो गॅरेजसमोर दुचाकीस्वारास अडवून जबरदस्तीने दहा हजारांचा मोबाइल काढून घेण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात ...
सांगली : येथील बायपास रस्त्यावरील बालाजी ऑटो गॅरेजसमोर दुचाकीस्वारास अडवून जबरदस्तीने दहा हजारांचा मोबाइल काढून घेण्यात आला. याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी इम्रान मलिकशान तासेवाले (वय १७, रा. जुना बुधगाव रस्ता) याने फिर्याद दिली आहे. भरवस्तीत जबरी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की इम्रान हा जुना बुधगाव रस्ता परिसरातील विघ्नहर्ता कॉलनीत राहतो. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी बायपास रस्त्यावरील बालाजी ऑटो गॅरेजसमोर तिघे जण दुचाकीवरून आले. तिघांनी जाकीट आणि मास्क घातले होते. इम्रान याला संशयितांनी अडविले. त्याच्या खिशातील दहा हजारांचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेत पलायन केले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.