पदवीधर कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज मगदुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:42+5:302021-07-03T04:17:42+5:30
सांगली : समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज मगदुम आणि उपाध्यक्षपदी संग्राम घोरपडे व आकाश पाटील यांची निवड झाली. ...
सांगली : समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज मगदुम आणि उपाध्यक्षपदी संग्राम घोरपडे व आकाश पाटील यांची निवड झाली.
पदवीधरांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्य राज्यभरात सुरू आहे. सांगली जिल्ह्यात विस्तारासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. अन्य तालुकाध्यक्ष असे : मिरज - हौसेराव साठे, कवठेमहांकाळ - ज्ञानदेव कांबळे, वाळवा - अंजनी सुतार, आटपाडी - वैशाली कांबळे, जत - शिवाजी तांबे, पलूस - अंजना गावडे, कडेगाव - सायली कुलकर्णी, खानापूर - मुनीर सुलताने, शिराळा - वैभव नायकवडी. तासगाव - सचिन कुंभार.
जिल्हा सल्लागार माया गडदे, रमजान शेख, विनायक कुलकर्णी.
अध्यक्ष मगदुम यांनी मागणी केली की, एमएसडब्ल्यू पात्रधारक पदवीधरांची शाळांमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करावी.