राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत झियानअली, वृचिकेत, सई शिंदेची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:46+5:302021-04-23T04:27:46+5:30
सांगली : पणजी (गोवा) येथे झालेल्या ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगलीच्या तीन खेळाडुंनी यश संपादन केले. ...
सांगली : पणजी (गोवा) येथे झालेल्या ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगलीच्या तीन खेळाडुंनी यश संपादन केले. यात झियानअली तांबोळी हिने १० वर्षाखालील गटात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक, सई शिंदे १० वर्षाखालील गटात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक व वृचिकेत अडमुठे याने आठ वर्षाखालील गटात तृतीय क्रमांकासह कांस्य पदक पटकावले.
सांगली मिरज कुपवाड रोलर स्केटिंग असोसिएशन व सई स्केटिंग अकॅडमी सांगली येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. ही स्पर्धा रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडियाच्या घेण्यात आली. स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, राजस्थान आदी राज्यातून सुमारे ३५० खेळाडू सहभागी झाले होते.
तिन्ही यशस्वी खेळाडूंना आंतराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक सूरज शिंदे, परविन शिंदे, आयेशा मुलानी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपाध्यक्ष प्रदीप घडशी, उद्योजक सुनील पवार यांचे प्रोत्साहन लाभले.