जिल्हा परिषदेत उद्या स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:05 PM2019-09-26T13:05:28+5:302019-09-26T13:05:43+5:30
सर्वांचा सहभाग : जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार
धुळे : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार आहे.
जिल्ह्यात ११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार २७ रोजी सकाळी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग व परिसरात विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व विभागाच्या कार्यालयात तसेच आवारात प्लॅस्टिक कचरा संकलन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच पंचायत समितीत देखील ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
२७ रोजी दुपारी ३ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा होईल. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, यांच्यासह सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांनी केले आहे.