जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:47+5:302021-05-27T04:28:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तांदूळवाडी : जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर आमची भर असणार आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या ...

Zilla Parishad will improve the quality of schools | जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविणार

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

तांदूळवाडी : जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर आमची भर असणार आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहे, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेस माॅडेल शाळेसाठी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर या शाळेची पाहणी व प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा टप्प्याटप्प्याने माॅडेल स्कूल करण्यात येणार आहे. भौतिक सुविधा पुरविण्यासह गुणवत्ता वाढविण्यावर आमचा भर आहे.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिक्षणावर सर्वांनी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवीत आहेत. माॅडेल स्कूलकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, उपसरपंच तबस्सुम पटेल, ग्रामपंचायत सदस्य आफताब पटेल, खुदबुद्दीन पटेल, विनया कदम, माजी सरपंच दिलावर पटेल, इकबाल पटेल, कमल कदम, सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल पटेल, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष इरफान पटेल, आदी उपस्थित होते. वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सहचिटणीस आसिफ पटेल यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक अल्ताफ मोमीन यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षिका मुमताज पटेल यांनी आभार मानले.

Web Title: Zilla Parishad will improve the quality of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.