शेतकऱ्यांची एक कोटी २९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:23 PM2019-01-27T23:23:46+5:302019-01-27T23:23:51+5:30

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ ...

 1 crore 29 lakh cheating of farmers | शेतकऱ्यांची एक कोटी २९ लाखांची फसवणूक

शेतकऱ्यांची एक कोटी २९ लाखांची फसवणूक

googlenewsNext

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या धामणकर दाम्पत्यावर खंडाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, दोघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खंडाळा येथील वैभव भास्कर-धामणकर व त्याची पत्नी नीलम यांच्या मालकीचे खंडाळा आणि वाई येथे ज्वेलर्सचे शोरुम आहेत. सन २०१६ मध्ये केसुर्डी (ता. खंडाळा) व परींंचे (ता. पुरंदर जि. पुणे) येथील शेतकºयांच्या जमिनी एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या मोबदल्यात मोठ्या रकमा या शेतकºयांकडे जमा झाल्या.
ही माहिती धामणकर पती-पत्नीला मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांशी त्यांनी जवळीक निर्माण केली. तसेच ‘आम्ही सोन्याची बिस्किटे तयार करून परदेशी पाठवतो. त्यातून पैसे दामदुप्पट केले जातात. आपली संपत्ती मोठी आहे,’ असे भासवून शेतकºयांचा विश्वास संपादन केला.
संबंधित पाच शेतकºयांना आपली रक्कम आमच्याकडे गुंतवा. दीड वर्षात दुप्पट रक्कम देतो. या रकमेचा चेक अथवा बँक खात्यावर देऊ, असे त्यांनी आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून या पाच शेतकºयांनी १ कोटी २९ लाख पन्नास हजार रुपये धनादेशाद्वारे धामणकर यांना दिले.
मुदत संपल्यानंतर सर्वजण पैसे मागण्यास गेले असता धामणकर दाम्पत्याकडून रक्कम देण्यास टाळाटाळ होऊ लागली. काही शेतकºयांना दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. त्याचवेळी शेतकºयांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन धामणकर दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी खंडाळा
पोलीस गेले असता दोघेही फरार झाले. फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील हे अधिक तपास करीत आहेत.
आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता
आर्थिक आमिष दाखवून शेतकºयांची सुमारे दीड कोटीची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर यात आणखी काही शेतकरी अडकले आहेत का? याबाबत पोलीस चाचपणी करीत आहे. औद्योगिकीकरणाच्या वाढीनंतर काही खासगी संस्था आणि वैयक्तिक लोकांकडे रक्कम वाढीसाठी गुंतवणुका केल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा व्यवहारात अडकलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title:  1 crore 29 lakh cheating of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.