खंडाळा नगरपंचायत क्षेत्रातील रस्त्यांना १ कोटी ४० लाखाचा निधी मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:40+5:302021-06-02T04:29:40+5:30

नगरपंचायतला विशेष अनुदान , शहर अंतर्गत रस्ते होणार चकाचक लाेकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : खंडाळा नगरपंचायत क्षेत्रातील विविध ...

1 crore 40 lakh sanctioned for roads in Khandala Nagar Panchayat area | खंडाळा नगरपंचायत क्षेत्रातील रस्त्यांना १ कोटी ४० लाखाचा निधी मंजुर

खंडाळा नगरपंचायत क्षेत्रातील रस्त्यांना १ कोटी ४० लाखाचा निधी मंजुर

Next

नगरपंचायतला विशेष अनुदान , शहर अंतर्गत रस्ते होणार चकाचक

लाेकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : खंडाळा नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रभागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागातून नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेतून १ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

राज्य शासनस्तरावर विशेष प्रयत्न करून हा खास निधी खंडाळा शहरवासीयांसाठी मंजूर करुन घेतला आहे . यामधून वेगवेगळ्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत . त्यामुळे खंडाळावासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे. खंडाळा नगरपंचायतीने नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष पुरविले आहे. या कामांमध्ये खंडाळा शहरातील प्रभाग सहामधील दोन कामांसाठी २५ लाख, प्रभाग १६ मधील तीन कामांसाठी ३५ लाख, प्रभाग एक मधील कामासाठी २० लाख, प्रभाग ३ मधील कामासाठी ३० लाख, प्रभाग पाच मधील कामासाठी १५ लाख, प्रभाग १७ मधील कामासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .

(कोट)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन विविध प्रभागातील कामांसाठी आमदार मकरंद पाटील यांचेकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार या कामांना निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून विशेष निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे रस्त्यांचे व मूलभूत सुविधांचे प्रश्न सुटणार आहेत.

- शरदकुमार दोशी , माजी नगराध्यक्ष

Web Title: 1 crore 40 lakh sanctioned for roads in Khandala Nagar Panchayat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.