खंडाळ्यात जलसंधारणाच्या कामासाठी १० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:36 AM2021-03-06T04:36:46+5:302021-03-06T04:36:46+5:30
खंडाळा : पाणी हेच जीवन आहे. शेती समृद्ध करण्यासाठी जलसिंचनाच्या योजना सुरळीत चालणे आवश्यक आहे. त्यासाठी शेती परिसरात जलसंचय ...
खंडाळा : पाणी हेच जीवन आहे. शेती समृद्ध करण्यासाठी जलसिंचनाच्या योजना सुरळीत चालणे आवश्यक आहे. त्यासाठी शेती परिसरात जलसंचय मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील विविध गावांत जलसंधारणाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी ४६ सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांसाठी सुमारे १० कोटी ८ लाख ४३ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील १०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी परिसरातील विहिरी, कूपनलिका यांचा जलसाठा उंचावणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित गावांतील ओढ्यांवर सिमेंट काँक्रिट बंधारे, पाणीसाठवण बंधारे बांधणे आवश्यक होते. तिन्ही तालुक्यांतील स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून ४६ नवीन बंधा-यांच्या बांधकामासाठी १० कोटींचा विशेष निधी मंजूर करून घेतला आहे.
मंजूर गावांची नावे अशी : वाई तालुका सुरूर, कोचळेवाडी, लगडवाडी, मापरवाडी, भुईंज, किकली, वरचे चाहूर, बदेवाडी, वयगाव, बोरगाव बुद्रुक. खंडाळा तालुका लोणंद, धावडवाडी, नायगाव, कवठे, खेड बुद्रुक, शिरवळ, जवळे, बावडा, पाडळी.
कोट
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड, बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने जलसंचयन होणे गरजेचे होते. हे काम लवकरच सुरू होईल.
- मकरंद पाटील,
आमदार
आमदार.