उंब्रजमध्ये दहा लाखांचा खुनी दरोडा-पाच ठिकाणी धुमाकूळ,उशी दाबून वृध्देला ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:41 PM2017-11-22T20:41:44+5:302017-11-22T20:44:36+5:30

10 lakhs of murderous killers killed in Umbraj | उंब्रजमध्ये दहा लाखांचा खुनी दरोडा-पाच ठिकाणी धुमाकूळ,उशी दाबून वृध्देला ठार मारले

उंब्रजमध्ये दहा लाखांचा खुनी दरोडा-पाच ठिकाणी धुमाकूळ,उशी दाबून वृध्देला ठार मारले

googlenewsNext

उंब्रज : उंब्रज परिसरातील पाच ठिकाणी जवळपास दहा लाखांपेक्षाही जास्त रकमेचा दरोडा टाकून टोळीने एका वृद्ध महिलेचा खूनही केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे कºहाड तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, सीसीटीव्हीतील फुटेजवरून दरोडेखोरांच्या मागावर विविध पोलिस पथके रवाना झाली आहेत.

याबात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री उंब्रजमध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी दरोडा टाकला. यामध्ये बाजारपेठतील उद्योजक मुल्ला कुटुंबीयांच्या बंगल्यात मागील बाजूने दरोडेखोर आत शिरले होते. चोरी करताना जैनुबी करीम मुल्ला (वय ८६) या जाग्या झाल्याने दरोडेखोरांनी तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. याठिकाणी ३० तोळे सोने लुटून दरोडेखोर पुढे पांडुरंग कुंभार यांच्या घरी गेले. या ठिकाणी सुमारे पाच तोळे सोन्यांचे दागिने तसेच दहा हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. त्याचबरोबर अन्य तीन ठिकाणीही या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दरोडेखोरांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे गावालगत असलेल्या इडली कामत हॉटेलमध्येही पहाटेच्या सुमारास चोरी केली.

ही घटना समजल्यानंतर रात्रीच्या सुमारासच पोलिस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. तर सकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथक आले होते. त्यांच्याकडून तपास सुरू होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.

‘पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून लवकरात लवकर दरोडेखोरांपर्यंत आम्ही पोहोचू,’ अशी ग्वाही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ही टोळी सातारा जिल्'ाबाहेरील असून, प्रत्येकजण किमान सहा फुटांपेक्षा अधिक उंचीचा असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

दरोड्यासाठी टेम्पोचा वापर...
उंब्रजमध्ये धुमाकूळ घालणाºया या दरोडेखोरांनी चक्क ४०७ हा टेम्पो वापरल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, उंब्रजमधील नागरिक जोरजोरात आरडाओरडा करीत असतानाही कुणालाही न घाबरता अत्यंत शांत डोक्याने ही टोळी हातात कुºहाडी अन् कोयते घेऊन दरोडे टाकत होती.

 उंब्रजमध्ये पाच ठिकाणी दरोडे पडल्यानंतर बुधवारी सकाळी घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती.
शिवडे, ता. कºहाड येथील हॉटेलातील सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद झाले आहेत.


 

 

Web Title: 10 lakhs of murderous killers killed in Umbraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.