वाळू डंपर अडविता १० लाखांचा दंड मिळे !

By Admin | Published: February 11, 2016 09:41 PM2016-02-11T21:41:06+5:302016-02-11T23:59:12+5:30

अनधिकृत गौणखनिज वापर : फलटण तालुक्यात मंडलाधिकारी, तलाठी कोतवाल यांची पथकाची कारवाई

10 million penalties for sand dump! | वाळू डंपर अडविता १० लाखांचा दंड मिळे !

वाळू डंपर अडविता १० लाखांचा दंड मिळे !

googlenewsNext

फलटण : ‘जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यामध्ये अनाधिकृत गौणखनिज वापराविरुद्ध धडक मोहीम राबवून २० वाहनांकडून दहा लाख सतराशे चौतीस रुपये दंड वसूल केला आहे. तसेच भरारी पथकाने पकडलेला एक ट्रॅक्टर पळून गेल्याने व अवैद्य माती उत्खनन केल्याने त्यांचे विरुद्ध शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे,’ अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख व तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
फलटण तालुक्यात अनाधिकृत गौणखनिज वाहतूक थांबविण्यासाठी संबंधित मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल यांची मंडल निहाय एकूण पाच फिरती पथके स्थापन करणेत आलेली आहेत. त्या पथकामार्फत अनाधिकृत गौणखनिज वाहतुकीची वाहने पकडून कारवाई करणेत आलेली आहे. ही कारवाई करताना वाहनामध्ये आढळून आलेल्या वाळूच्या बाजारभावाच्या किमतीच्या पाच पट दंड वसूल केला जातो व या वाहनाची वाळू जप्त केली जाते. त्यानुसार जिंती (फलटण )येथे कारवाई करण्यात आली.
मागील महिनाभरात दंड वसूल करण्यात आला. यामध्ये दत्तात्रय महादेव कोळेकर (१०६२०० ) कंसात दंडाची रक्कम, देविदास मल्हारी लोखंडे (१०६२०० ),लहू पिराज गोफणे (२६,५०० ), संतोष हणमंत देशमुख (२६,५००), दीपक सुभाष गायकवाड (१०६२००), अक्षय नारायण सोडमिसे (१०६२००), अंकुश लोखंडे (८,३१९), रोहिदास रामदास गायकवाड (७९,६००),दत्तात्रय हिरामन विटकर (२६,५००), कैलास सीताराम ढेकळे (४०,०००), रामा मोहन काळे (२६,५००), ईश्वर ज्ञानदेव गुंजाळ (२६,५००), लक्ष्मण लोखंडे (९०१५), जालिंदर बापूराव लोंढे (३७,५००),बापू नागू माने ( ३७,५००), स्वप्नील पोपट जाधव (३७,५००), सूरज आनंदा पवार (२२,०००), विष्णू अर्जून भोसले (१,०००००), नीलेश बाबा जाधव (३७,५००), नवनाथ पोपट जाधव (३७,५००) असा एकत्रित एकूण दहा लाख सतराशे चौतीस रुपये दंड वसूल केला. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवरील कारवाई यापुढे ही चालू राहील असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)

कारवाईने माफिया हादरले
फलटण तालुक्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गौणखनिज माफिया पुरतेच हादरले आहेत. शासकीय यंत्रणांनी राबविलेल्या दंड वसुलीमुळे सध्या सर्वत्र खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशी कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून होत आहे.

Web Title: 10 million penalties for sand dump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.