जिल्ह्यात नवीन १० कोविड रुग्णालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:02+5:302021-05-09T04:41:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात नवीन १० कोरोना रुग्णालये सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. या नवीन रुग्णालयांमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात नवीन १० कोरोना रुग्णालये सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. या नवीन रुग्णालयांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकचे ४९० बेड उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता एकूण ८५ रुग्णालये उपलब्ध झालेली आहेत. जिल्ह्यात आता एकूण बेडची संख्या ४ हजार १७५ इतकी झालेली आहे. लहान मुलांनादेखील कोरोनाची लागण होऊ लागल्याने त्यांच्यासाठी सातारा शहरातील चिरायू हॉस्पिटल येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोरेगाव येथील जितराज रुग्णालय, फलटणमध्ये उत्कर्ष लॉज, वाईमध्ये सुखांजली, साताऱ्यात चिरायू हॉस्पिटल, कऱ्हाडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय कॉल, नवजीवन हॉस्पिटल सातारा, पुष्कर हॉल, लाइफ केअर कऱ्हाड, सौभाग्य निढळ, कोहिनूर हॉस्पिटल नागठाणे अशी नव्याने कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आलेली आहेत.