वाई अर्बन बँककडून कोविड सेंटरसाठी १०० बेड -चंद्रकांत काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:32+5:302021-04-30T04:48:32+5:30
वाई : ‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत ...
वाई : ‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने १०० बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत,’ अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांनी दिली.
सीए चंद्रकांत काळे म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात व संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या कोरोना रोगाचा मुकाबला करणे, ही सर्वांचीच जबाबदारी बनली आहे. अशा अडचणीच्या काळात वाई अर्बन बँक परिवाराने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाई परिसरांत १०० बेड कोरोना केअर सेंटरसाठी मदत देण्यात आली आहे. यापुढील काळातही कोरोना रोगाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी तसेच कोविड सेंटरसाठी आवश्यक असेल ती मदत शासनास करणार आहे.’
कोविड केअर सेंटरला १०० बेड देतेप्रसंगी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक डाॅ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, सीए राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, अंजली शिवदे, गीता कोठावळे, सीए किशोरकुमार मांढरे, अनिल देव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, काशीनाथ शेलार, अरुण पवार, प्रशांत नागपूरकर, युनूस पिंजारी, दिशा अकॅडमीचे संचालक डाॅ. नितीन कदम, पृथ्वीराज पिसाळ-देशमुख, चंद्रकांत कदम आदी व मान्यवर उपस्थित होते. (वा.प्र.)
फोटो - २९वाई जाहिरात
वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने १०० बेड कोरोना केअर सेंटरकरिता प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले, तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे सुपुर्द करताना सीए चंद्रकांत काळे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.