शंभराची छत्री अन दिडशेची दुरूस्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:33 PM2017-07-24T17:33:49+5:302017-07-24T17:33:49+5:30
चायनीज छत्रींचा फंडा : एकाच पावसात काड्या मोडल्याने ग्राहक त्रस्त
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. २४ :चलें तो चाँद तक... नही तो शाम तक असे चायनीज वस्तुंच्या खात्रीविषयी बोलले जाते. साताऱ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर लक्षात घेता पहिल्या पावसात शंभर रूपयांच्या छत्रींच्या तारा गळून पडल्या आहेत. त्यामुळे त्यांची दुरूस्ती मुळ किंमतीच्या दीडपट होत असल्याने शंभराची छत्री अन दिडशेची दुरूस्ती अशी अवस्था खरेदीदारांची झाली आहे.
बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात रंगबेरंगी आकर्षक अशा चायनामेड छत्र्या दाखल झाल्या आहेत. चटकदार रंग, उत्तम डिझाईन आणि कमी किंमत यामुळे या छत्र्या घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
स्वस्त मिळतायत म्हणून या छत्री घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही तुलनेने मोठी आहे. पण या छत्रीचा एक एक तारा निखळू लागल्याने आता सांभाळणं आणि फेकणं असं दोन्ही अवघड होवून बसल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे.