उमेद अभियानातील १० हजार महिला उतरणार रस्त्यावर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 03:37 PM2020-10-07T15:37:08+5:302020-10-07T15:38:23+5:30

उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती थांबविणे आणि अभियान बाह्य संस्थेकडे वर्गच्या हालचाली सुरू झाल्याने ५० लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे १० हजार महिला सोमवारी रस्त्यावर उतरून मूक मोचार्तून शासनाचा निषेध नोंदविणार आहेत.

10,000 women from Umed Abhiyan will take to the streets ..! | उमेद अभियानातील १० हजार महिला उतरणार रस्त्यावर..!

उमेद अभियानातील १० हजार महिला उतरणार रस्त्यावर..!

googlenewsNext
ठळक मुद्देबाह्य संस्थेकडे वर्गच्या हालचाली मूक मोर्चातून शासनाचा निषेध नोंदविणार

सातारा : उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती थांबविणे आणि अभियान बाह्य संस्थेकडे वर्गच्या हालचाली सुरू झाल्याने ५० लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे १० हजार महिला सोमवारी रस्त्यावर उतरून मूक मोचार्तून शासनाचा निषेध नोंदविणार आहेत.

याबाबत संबंधितांनी दिलेली माहिती अशी की, महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या अभियानाला जोडलेल्या ५० लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून, संस्था मोडकळीस येण्याची भीती आहे. संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी राज्यातील १० लाख महिलांनी एल्गार पुकारला आहे. सोमवार, दि. १२ आॅक्टोबरला राज्यात मूकमोर्चा काढून शासनास जाब विचारणार आहेत.

सातारा जिल्ह्यातही सोमवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील १० हजार महिला सहभागी होतील, असे नियोजन आहे. त्यामुळे महिलांनी अभियानाला वाचविण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यभर मूकमोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे, असेही सांगण्यात आले.

 

Web Title: 10,000 women from Umed Abhiyan will take to the streets ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.