जिंती गावातील १०३ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:47 AM2021-06-09T04:47:58+5:302021-06-09T04:47:58+5:30
जिंती : कोरोना झाल्यानंतर तरुण मंडळीही हातपाय गाळून बसतात. पण फलटण तालुक्यातील जिंती येथील कोंडाबाई रणवरे या १०३ वयाच्या ...
जिंती : कोरोना झाल्यानंतर तरुण मंडळीही हातपाय गाळून बसतात. पण फलटण तालुक्यातील जिंती येथील कोंडाबाई रणवरे या १०३ वयाच्या आजीबाईंनी कोरोनाही घरात उपचार घेऊनच हरवले. या काळात त्यांना द्रवस्वरूपात अन्न दिले जात होते.
जिंती गावातील कोंडाबाई रणवरे या आजीबाईंना थकवा जाणवू लागला. तापही आल्याने प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रशांत बनकर यांनी घरी जाऊन चाचणी केली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. आजीला उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न केला, पण वय जास्त असल्याने डॉक्टरकडून प्रतिसाद मिळाला नाही. वय जास्त असल्याने दवाखान्यात उपचार करणे अवघड होते. त्यांना चांगले दिसत नाही. चालायला येत नसल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे होते. त्यांतच फलटण तालुक्यातील रुग्णालये भरलेली होती.
फलटणमधील हाॅस्पिटलमधे उपचारासाठी दाखल अवघड होते. तरीसुद्धा उपचारासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांनी दोन्ही डोळे दिसत नसल्याने आजी एका जागेवर बसून असतात. त्यांना चालता येत नाही. त्यामुळे कोरोना उपचार घरी सुरू करण्याचा आजीचा नातू शरद यांनी निर्णय घेतला. घरातील सर्वजण बाधित असल्याने घरातील आई, भाऊ व वहिनी बारामती येथे उपचारासाठी दाखल केले. वडील बाधित असल्याने त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. घरात सर्व बाधित असल्याने खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली होती.
तसेच घरातील सर्व बाधित असल्याने शरद रणवरे यांनी सर्वात मोठी समस्या सामोरे जावे लागले. यामध्ये वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने घाबरून न जाता आजीचा जीव वाचवण्यासाठी घरी औषधोपचार सुरू केला. घरामध्ये सर्व बाधित असल्याने वडिलांच्या मृत्यूबद्दल कोणत्याही परिस्थितीत न सांगण्याचे निर्णय घेण्याचे ठरविले. आजी बाधित आल्यापासून रोज सकाळी-संध्याकाळ तांदळाची खीर, फळांचा रस, चपाती दुधामध्ये चुरून चारणे अशा पद्धतीने रोजचा आहार सुरू ठेवला.
गोळ्याही रसातून दिल्या
कोरोना रुग्णांना असणाऱ्या गोळा बारीक करून फळांचा रसामध्ये देण्यात आल्या होत्या. सुरुवातीच्या दोन दिवसांत आजीची तब्येत खालावली होती. नातवाने घेतली काळजी जिद्द या जोरावर आजी अखेर कोरोनाला हरवण्यास यशस्वी झाली.
फोटो
०८जिंती
फलटण तालुक्यातील जिंती येथील कोंडाबाई रणवरे यांना कोरोनाकाळात नातवानेच चांगली काळजी घेतली.