कोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग, १०२ टीएमसी साठा : धोम, उरमोडीतील आवक थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:57 PM2018-09-17T13:57:15+5:302018-09-17T13:59:12+5:30
अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे.
सातारा : अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. मात्र, रविवारी काही भागात पुन्हा पाऊस झाला. कोयना धरणात सध्या २७५६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर कण्हेरमध्ये ९.८७ टीएमसी साठा असून १०२ क्युसेक पाणी येत आहे. सध्या या धरणात ९७.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
बलकवडीत ४.०२ टीएमसी साठा असून टक्केवारी ९८.६२ आहे. उरमोडीत ९.५१ टीएमसी पाणीसाठा असून पाण्याची आवक थांबली आहे. तर डाव्या कालव्यातून ४५० क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्यात येऊ लागले आहे.
तारळी परिसरात एक मिलीमीटर पाऊस झाला असून ५० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणाचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या माण, खटाव, फलटण या तालुक्यात रविवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.