फलटणमध्ये उच्चांकी १०७१ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:27+5:302021-05-28T04:28:27+5:30
फलटण : फलटण तालुक्यात गुरुवारी कोरोना बाधितांची संख्या १०७१ आल्याने प्रचंड खळबळ माजली गेली. मात्र प्रांताधिकारी यांनी गेल्या चार-पाच ...
फलटण : फलटण तालुक्यात गुरुवारी कोरोना बाधितांची संख्या १०७१ आल्याने प्रचंड खळबळ माजली गेली. मात्र प्रांताधिकारी यांनी गेल्या चार-पाच दिवसातील प्रलंबित राहिलेल्या अहवालाची संख्या एकत्रित केल्याने एवढी आकडेवारी आल्याचे स्पष्ट केल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
फलटण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या १०७१ आल्याचे प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारी दाखविण्यात आली. सोशल मीडियावर हा आकडा पसरल्याने सर्वत्र खळबळ माजली गेली. गेले काही दिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जनता चिंतीत होतीच. गुरुवारी मात्र एवढा मोठा आकडा ऐकून भीतीचे वातावरण पसरू लागले. या गोष्टींची त्वरित दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी फलटण तालुक्यातील दि. २६ रोजीचा कोविड बाधित आलेल्या व्यक्तींची संख्या १४७ आहे.
मात्र, मागील चाचण्या पोर्टलवर अपडेट करण्याचे काम प्रलंबित होते. ते सध्या सुरू असल्याने बाधित व्यक्तींची संख्या १०७१ अशी दाखवली जात आहे. मात्र, बुधवारची प्रत्यक्ष बाधित आलेल्या व्यक्तींची संख्या १४७ आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.