कऱ्हाड, मलकापूरसाठी अकरा कोटी
By admin | Published: August 29, 2014 09:05 PM2014-08-29T21:05:01+5:302014-08-29T23:14:45+5:30
नगरविकास विभागाकडून मुख्यमंत्र्यांची भेट
कऱ्हाड : कऱ्हाड पालिका व मलकापूर नगरपंचायतीसाठी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अकरा कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे़ तसेच ग्रामीण भागातील मुख्य जोडरस्ते करण्यासाठी अतिरिक्त कार्यक्रमाअंतर्गत ४५ लाख देण्यात आले आहेत़ कऱ्हाडसाठी चार कोटी आठ लाख निधी दिला असून, त्यात शुक्रवार पेठेत सभामंडप, सार्वजनिक शौचालये तसेच कऱ्हाड ग्रामीण अंतर्गत खराडे कॉलनी, मुजावर कॉलनी, तलाठी कॉलनी येथील रस्ते बांधकामासाठी एक कोटी तीस लाख, प्रकाशनगर, राजाराम पार्क रस्ते सुुधारण्यासाठी ९५ लाख तर त्रिमूर्ती कॉलनी, श्रीराम कॉलनी, उदय कॉलनी येथील रस्त्यासाठी एक कोटी तीस लाख, तर नव्याने हद्दवाढ झालेल्या परिसरातील रस्त्यांच्या खडीकरणासाठी पन्नास लाख व गटार बांधकामासाठी पंचवीस लाख निधी देण्यात आला आहे़ मलकापूरमधील झोपडपट्टी परिसरात संरक्षक भिंतीसाठी दोन कोटी पंधरा लाख, नगरपंचायत इमारत दोन कोटी व रस्ते, गटारसाठी ७५ लाख एवढा निधी आला असल्याची माहिती आमदार आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ अशोकराव पाटील, मनोहर शिंदे, श्रीकांत मुळे, अॅड़ बाळासाहेब पाटील, पै़ नाना पाटील, स्मिता हुलवान, सुनील पाटील उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री उद्या कालेत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर येत असून, काले येथे जनतेशी थेट संवाद साधणार आहेत़ शिवाय यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली़