काळे, धरणे यांच्यासह ११ जणांना सेवापदक

By Admin | Published: January 26, 2016 12:44 AM2016-01-26T00:44:38+5:302016-01-26T00:44:38+5:30

नक्षलग्रस्त भागातील सेवेबद्दल सन्मान

11 people including Kale, Dharan | काळे, धरणे यांच्यासह ११ जणांना सेवापदक

काळे, धरणे यांच्यासह ११ जणांना सेवापदक

googlenewsNext

सातारा : दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत अशोक काळे, सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव अप्पासाहेब धरणे यांच्यासह जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गृह विभागाने विशेष सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. नक्षलग्रस्त विभागात दोन वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केल्याबद्दल ही पदके प्रदान करण्यात येणार आहेत.
प्रजासत्ताकदिनी जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत. मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान किसन चवरे, ढेबेवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक लिंगय्या रंगय्या चौखंडे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील लक्ष्मण जाधव, कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील सुरेश लोखंडे, फलटण शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ विष्णू लांडे, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मालोजी बाळासाहेब देशमुख, औंध पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर रंगराव अतिग्रे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन मनोज मछले आणि वडूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दुर्गनाथ रामनाथ साळी यांना विशेष सेवापदक प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 11 people including Kale, Dharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.