फलटणमधून १११ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:26+5:302021-05-01T04:37:26+5:30
फलटण : येथील कत्तलखान्यात पुन्हा १११ जनावरे सापडली आहेत. या जनावरांची पोलिसांनी सुटका केली. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या ...
फलटण : येथील कत्तलखान्यात पुन्हा १११ जनावरे सापडली आहेत. या जनावरांची पोलिसांनी सुटका केली.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील कुरेशीनगर येथे शुक्रवारी (दि. ३०) रोजी पहाटे दोन वाजता १०५ वासरे, सहा काळ्या पांढऱ्या, तपकिरी रंगाचे गाई तसेच एक काळ्या पांढऱ्या रंगाचे जरशी खोंड आढळून आले. त्यांची किंमत ३ लाख ४५ हजार रुपये आहे. याप्रकरणी इरफान याकूब कुरेशी (रा. कुरेशीनगर फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गोरक्षक पुणे येथील शादाब चांद मुलानी (रा. पुणे), निखिल नीळकंठ दरेकर (रा. खराडी पुणे,) सचिन साहेबराव चित्रे (रा. पुणे), नीलेश उत्तम पवार (रा. फुरसुंगी पुणे) यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अच्युत जगताप यांनी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.