कोरेगाव तालुक्यात ४६८ जागांसाठी ११५८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:21+5:302021-01-04T04:32:21+5:30

कोरेगाव : तालुक्यातील मिनी विधानसभा निवडणूक समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक ऐन ऐरणीवर आली आहे. ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक ...

1158 applications for 468 seats in Koregaon taluka | कोरेगाव तालुक्यात ४६८ जागांसाठी ११५८ अर्ज

कोरेगाव तालुक्यात ४६८ जागांसाठी ११५८ अर्ज

googlenewsNext

कोरेगाव : तालुक्यातील मिनी विधानसभा निवडणूक समजली जाणारी ग्रामपंचायत

निवडणूक ऐन ऐरणीवर आली आहे. ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी तब्बल ११५८ उमेदवारी अर्ज रिंगणात उतरले

आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. ४ रोजी दुपारी तीन वाजता संपत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांची दोन ते तीन दिवस धावपळ सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर एक वर्षानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर

झाल्याने ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे. अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयासाठी लागणारी कागदपत्रे जुळवण्यापासून ते आरक्षित जागांवरील उमेदवारांच्या जातपडताळणीसाठी अनेकांनी दिवसरात्र एक केला. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये गावी अडकलेले शहरातील लोक ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. गावचा विकास व्हायचा असेल तर निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

राजकीय विरोधकांबरोबर चर्चेच्या फेऱ्या घडवत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही गावांमध्ये यशस्वी झाला. अन्यत्र जोरदार लढती होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. अनेकांनी तर गावपातळीवरील प्रमुखांना पॅनल निवडीचे अधिकार बहाल केले आहेत. काही ठिकाणी पक्ष पातळीवर, तर काही ठिकाणी गावपातळीवर निवडणूक होत आहे, त्याला पक्षीय रंग चढलेला नाही. निवडणूक होत असलेल्या जागांपेक्षा जवळपास तिप्पट अर्ज दाखल झाल्याने इच्छुकांना थांबविण्यासाठी रणनीती आखली आहे. बैठकांचा सपाटा लावला आहे. दूरवरच्या पाहुण्यांपासून ते राजकीय पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांनी दूरध्वनी अथवा मोबाईलवरून संपर्क साधत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट :

आमने-सामने लढतीची शक्यता

तालुक्यात दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट लढत होणार असल्याचे

स्पष्ट झाले आहे. अनेक गावांमध्ये डमी अर्ज भरले आहेत. छाननीमध्ये केवळ ८ अर्ज अवैध ठरल्याने गाव पुढाऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार असून, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. एकंदरीत तालुक्यात आमने-सामने थेट लढत होणार आहे, हे मात्र निश्‍चित आहे.

Web Title: 1158 applications for 468 seats in Koregaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.