Satara Crime: मलटण येथे १२ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 03:04 PM2023-04-26T15:04:38+5:302023-04-26T15:05:04+5:30

२ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा एकूण १२ किलो २३० ग्रॅम गांजा

12 kg ganja seized at Malatan Satara, Both were arrested | Satara Crime: मलटण येथे १२ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

Satara Crime: मलटण येथे १२ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

googlenewsNext

नसीर शिकलगार

फलटण/ मलटण : फलटण शहर पोलिसांनी मलटण येथे केलेल्या कारवाईत दोन युवकांना गांजा विक्री करताना अटक केली असून, त्याच्या ताब्यातील २ लाख ४४ हजार रुपये किमतीचा एकूण १२ किलो २३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना कुंभारभट्टी, मलटण, फलटण येथील युवराज मोरे नावाचा युवक गांजाची विक्री करत असल्याची बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी एक पोलिस पथक तयार करून कारवाई करण्याची सूचना केली. 

पथकाने कुंभारभट्टी, मलटण येथील युवराज मोरे याच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्याठिकाणी युवराज बाळू मोरे (रा. कुंभारभट्टी, मलटण) व त्याच्याकडे कामास असलेला रामा राजेश जाधव (रा. मलटण, फलटण) असे मिळून आले. त्यांची झडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यात २ लाख ४४ हजार ६००रुपये किमतीचा एकूण १२ किलो २३० ग्रॅम गांजा आढळून आला. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे, अमोल कदम, सचिन जगताप, दिग्विजय सांडगे, सुजित गावडे, सूरज परिहार, शरद तांबे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: 12 kg ganja seized at Malatan Satara, Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.