Satara: कऱ्हाडच्या 'शिवशंकर' पतसंस्थेत १३ कोटींचा अपहार झाल्याचा ठपका, लेखा परिक्षकांनी शहर पोलिसांना दिला अहवाल 

By प्रमोद सुकरे | Published: March 14, 2024 07:11 PM2024-03-14T19:11:27+5:302024-03-14T19:11:48+5:30

पोलिसांची कायदेशीर कार्यवाही सुरू 

13 crores embezzlement in Karad Shivashankar credit institution, auditor reports to city police | Satara: कऱ्हाडच्या 'शिवशंकर' पतसंस्थेत १३ कोटींचा अपहार झाल्याचा ठपका, लेखा परिक्षकांनी शहर पोलिसांना दिला अहवाल 

Satara: कऱ्हाडच्या 'शिवशंकर' पतसंस्थेत १३ कोटींचा अपहार झाल्याचा ठपका, लेखा परिक्षकांनी शहर पोलिसांना दिला अहवाल 

प्रमोद सुकरे

कऱ्हाड : येथील बहुचर्चीत शिवशंकर नागरी पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजारांचा अपहार झाल्याचा अहवाल गुरुवारी  विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी शहर पोलिसांना दिला आहे. त्यानुसार त्या सगळ्याची पोलिस चौकशी सुरू झाली आङे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

ठेव नसताना ठेव तारण कर्जाचे वाटपासहीत विनातारण कर्ज वितरण, कागदपत्रांचीही पूर्तता न करताच कर्ज वितरणासारखे आणि खोट्या सह्या, बनावट कागदपत्रांच्या आधारावर अपहार केल्याचे त्यात म्हटले आहे. त्या सगळ्याची पोलिस चौकसी होणार आहे. त्यामुळे संस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार ७२२ रूपयांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. ठेवीदारांनाही पोलिस ठाण्यात धाव घेत त्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याबाबतचे निवेदनही पोलिसांना ठेवीदारांनी दिले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवशंकर पतसंस्थेत एक एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षम झाले. ते लेखा परिक्षण विसेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी केले आहे. त्यानुसार त्यांनी अहवाल दिला आहे. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार अपहार झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. त्यानुसार संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी सुचवले आहे.

त्याशिवाय उपनिबंधक जनार्दन शिंदे यांनीही विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी सादर केलेल्या अहवालत पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार अपहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्या आर्थिक नुकसानीस जबाबादर असणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

 कर्ज वितरण करताना तारण न घेणे, अपूर्ण कागदपत्रे, त्यासह व्यवस्थापक व सेवकांच्या मदतीने तयार केलेल्या खोट्या व बनावट कागदपत्रे वापरली आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या हीतास बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वासघात, फसवमूक करून संचालक मंडळाने हेतु पुरस्सर नियमबाह्य व पदाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने तब्बल ११ कोटी ५३ लाख १६ हजार ९१५ रूपयांचा अपहार केल्याचा ठपका त्यानीही ठेवला आहे.

 त्यासह ठेव नसताना ठेव तारणाच्या नावाखाली तब्बल एक कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही वितरण केल्याचे त्यांच्या अहवाला नमूद आहे. पोलिसांनी ते अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार त्याची त्या सगळ्याची पोलिस चौकशी सुरू झाली आहे, असे पोलिस निरिक्षक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगतिले.


ठेवीदारांचा पोलिसांना गराडा

शिवशंकर पतसंस्सथेच्या ठेवीदार कृती समितीने पोलिस ठाण्यात आज भेटून निवेदन देत त्यांना कारवाईची विनंती केली. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कागदपत्रे न तपासता, संस्थेबद्दल कोणतेही कात्री किंवा दोष दुरुस्ती अहवालात दाखवलेले नाही. संचालक मंडळ, कर्मचारी व लेखापरीक्षक यांनी परस्पर संगनमताने ठेवीदारांची फसवणूक करून २८ कोटींची आर्थिक लूट केली आहे. त्यांच्यावर ठेवीदारांचा व शासन फसवणूकीबद्ल व एमपी आयडीनुसार गुन्हा नोंद दाखल करावा. संर्व संशयीत फरार होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्राप्त अहवालानुसार दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करावी.

Web Title: 13 crores embezzlement in Karad Shivashankar credit institution, auditor reports to city police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.