राज्यस्तरीय स्पर्धेत साताऱ्यातील १३ शेतकऱ्यांची बाजी; भात, ज्वारी, बाजरी अन् सोयाबीनमध्ये प्रथम

By नितीन काळेल | Published: September 1, 2022 05:46 PM2022-09-01T17:46:29+5:302022-09-01T17:47:05+5:30

राज्याच्या कृषी आयुक्तालयाने २०२१-२२ वर्षातील खरीप पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे.

13 farmers from Satara won the state level competition; First in rice, sorghum, millet and soybeans | राज्यस्तरीय स्पर्धेत साताऱ्यातील १३ शेतकऱ्यांची बाजी; भात, ज्वारी, बाजरी अन् सोयाबीनमध्ये प्रथम

राज्यस्तरीय स्पर्धेत साताऱ्यातील १३ शेतकऱ्यांची बाजी; भात, ज्वारी, बाजरी अन् सोयाबीनमध्ये प्रथम

googlenewsNext

सातारा : राज्याच्या कृषी आयुक्तालयाने २०२१-२२ वर्षातील खरीप पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून  यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. सर्वसाधारण गटात ३० विजेते ठरले. यामधील १३ सातारा जिल्ह्यातील आहेत. तर भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.

राज्यात पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी विविध भागांतील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादकता वाढ करत असतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात येतो. यासाठी राज्याच्या उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने राज्यात पीक स्पर्धा घेण्यात येते.

खरीप पिकांसाठी २०२१-२२ वर्षात मूग, उडीद, सोयाबीन, तूर, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी आणि भुईमूग या १० पिकासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात विजेतेपद मिळविले. पीक उत्पादकता हेक्टरी घेण्यात आलेली आहे. त्यानंतर विजेते निश्चित करण्यात आले आहेत.

बाजरीत हेक्टरी १०० क्विंटल उत्पादन...

खरीप बाजरी पीक स्पर्धेत तिघेही विजेते शेतकरी हे सातारा जिल्ह्यातील आहेत. यामध्ये प्रकाश गायकवाड यांनी बाजरीचे हेक्टरी १०० क्विंटल उत्पादन घेतले. तर छबन गायकवाड ९३ आणि दशरथ गेंड यांनी ९२ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

भुईमुगाचे ४९ क्विंटल उत्पादन...

भुईमुगात प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आला असून त्याने हेक्टरी ७२ क्विंटल उत्पादन घेतले. तर साताऱ्याच्या शंकर कदम यांनी ४९ तसेच अधिक माने यांनी ४४ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

ज्वारीत ४६ क्विंटल उत्पादन...

ज्वारी पीक स्पर्धेतही सातारा जिल्ह्यातील तिघां शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. हे तिघेही एकाच गावचे राहिवशी आहेत. तानाजी यादव यांनी हेक्टरी ४६ क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

पीक स्पर्धेतील जिल्ह्यातील विजेते शेतकरी
खरीप मूग :
- विजय तात्यासो देवकर. द्वितीय क्रमांक (रा. मोही, ता. माण)
- मनोहर शंकर देवकर. तृतीय क्रमांक (मोही, ता. माण)

खरीप सोयाबीन :
- सुरेश शंकरराव पाटील. प्रथम क्रमांक (रा. उंडाळे, ता. कऱ्हाड)  
- सुहास शंकर कदम. तृतीय क्रमांक (रा. इंदोली, ता. कऱ्हाड)

खरीप ज्वारी :
- तानाजी श्रीपती यादव. प्रथम क्रमांक
-पांडुरंग आनंदा यादव. द्वितीय क्रमांक
- संदीप रामचंद्र यादव. तृतीय क्रमांक (तिघेही रा. गमेवाडी-पाठरवाडी, ता. कऱ्हाड)
 
खरीप बाजरी :
- प्रकाश हणमंत गायकवाड. प्रथम क्रमांक (रा. पिसाळवाडी, ता. खंडाळा)
- छबन नारायण गायकवाड. द्वितीय क्रमांक (रा. भादे, ता. खंडाळा)
- दशरथ नामदेव गेंड. तृतीय क्रमांक  (रा. मनकर्णवाडी, ता.  माण)  

खरीप भुईमूग :
- शंकर रामचंद्र कदम. द्वितीय क्रमांक (रा. इंदोली, ता. कऱ्हाड)
- अधिक मारुती माने. तृतीय क्रमांक (रा. मानेगाव, ता. पाटण)

भातात १५४ क्विंटल उत्पादन...
- साहेबराव मन्याबा चिकणे. प्रथम क्रमांक (रा. सोनगाव, ता. जावळी). चिकणे यांनी भात पिकात हेक्टरी १५४ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

Web Title: 13 farmers from Satara won the state level competition; First in rice, sorghum, millet and soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.